फक्त तुझ्याच साठी - 5

  • 204
  • 114

️फक्त तुझ्याच साठी ️हॉटेलच्या पोर्चमध्ये...एकामागून एक जगप्रसिद्ध उद्योगपतींच्या गाड्या थांबल्या होत्या मीडिया कॅमेऱ्यांचे फ्लॅश सतत चमकत होते...सगळे बिझनेस टायकून आलेले होते.. पण ते लोक ज्याची वाट पहात होते.. तो अजून आला न्हवता..अचानक...दूरवरून काळ्या रंगाच्या आलिशान गाड्यांचा ताफा वेगाने हॉटेलकडे येताना दिसला.पहिली...दुसरी...तिसरी...पूर्ण ताफा हॉटेलसमोर येऊन एका रेषेत थांबला..आणी इतका वेळ आळसलेले मीडिया वाले पटपट पुढे आले... त्याचा एक फोटो घेण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरु होती..क्षणात ब्लॅक सूटमधील कमांडोज गाड्यांमधून उतरले.संपूर्ण परिसर त्यांच्या संरक्षण कवचात गेला.मीडियाचा गोंधळ एका क्षणात शांत झाला.सर्वांच्या नजरा त्या मधल्या गाडीवर खिळल्या.ड्रायव्हर सीटमधून एक तरुण खाली उतरला.उंच बांधा...तल्लख नजर...काळा सूट...तो होता...कबीर.आर्यवीरचा सर्वात विश्वासू माणूस...मित्र...पर्सनल सेक्रेटरी...आणि त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारा.त्याने