️फक्त तुझ्याच साठी ️पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी खिडकीच्या पडद्यामधून अलगद आत शिरत तिच्या शांत, निरागस चेहऱ्यावर हलकासा स्पर्श केला... जणू त्या सोनेरी किरणांनाही तिच्या सुकुमार रूपाला स्पर्श करण्याचा मोह आवरला नव्हता.खोलीत प्रसन्न शांतता पसरली होती...भिंतीवर लटकलेल्या श्रीकृष्णाच्या छोट्याशा फ्रेमवर पडणारा सूर्यप्रकाश, खिडकीतून आत येणारा गार वारा आणि त्या वाऱ्याबरोबर हलकेच डोलणारे पडदे... सगळंच वातावरण मनाला विलक्षण शांत करणारे होते.पांढऱ्याशुभ्र उशीवर तिचा निरागस चेहरा विसावला होता.तिचे मोठे, रेखीव डोळे अजूनही लांबसडक पापण्यांच्या आड शांतपणे मिटलेले होते. गुलाबी, कोरीव ओठांवर नकळत उमटलेलं हलकंसं हसू... नितळ गोरा वर्ण... सरळ, सुबक नाक... आणि गालांवर झोपेमुळे उमटलेली कोवळी लालसर छटा...लांबसडक काळेभोर केस अर्धे उशीवर तर अर्धे