स्वप्नद्वार... भाग 10 ( अंतारंभ) भाग 9 वरून पुढे " शक्य नाही "" पण का?" निशांत प्रश्नार्थक नजरेने विचारू लागला. त्याच्या कपाळावरील एक शीर सरळ रेषेत आकसली होती. " मायावी... आभासी किंवा स्वप्नदुनियेत जाण्याची अद्भूतं क्रिया म्हणजे अनाहतभेदन. अनाहतभेदन क्रियेसाठी चंचल मनाला स्थिर करणे तसेच या क्रियेचा दुसरा चरण म्हणजे संमोहन ह्या सर्व गोष्टी जर अगदी लयबद्ध पद्धतीत जुळून आल्या तरच ही क्रिया यशस्वी होऊ शकते. मागच्या वेळी तू तुझ्या स्वप्नदुनियेत अगदी सहज प्रवेश करू शकला कारण त्यावेळेस तुझं चित्त हे निर्मळ जलासारखं स्थिर होत. पण या वेळेस तुझ्या मनाच्या आकाशात भीती, चिंता, निरउत्सहाचे ढग जमले आहे. या मनःस्थितीत स्वप्नदुनियेत प्रवेश करणं