नाते जन्मापलिकडचे - भाग 1

"ए बैला! उठ पटकन, नाहीतर शाळेत जायला घाई घाई करशील!!"आईच्या ओरड्याने एक मुलगा आळस देऊन उठला. त्या ओरड्याचा खास काही फरक पडला नव्हता.आळशी बैलाने काय केलं असेल. तो बेडरूम मध्ये जाऊन पुन्हा झोपला. आईला मात्र वाटत होते कि गेला असेल तयारी करायला, पण बघते तर काय हा अजून इथे झोपलाय.आई मधला नीरज चोप्रा जागा झाला . तिने लगेच बाजूला जी तिची ऑर्थोपेडीक चप्पल घेतली, ह्ये असा निशाणा लावला थेट त्याच्या तोंडावर चापकन कानाखाली बसली.त्याच्या माराणे तो ताडकन जागा झाला. समोर त्याला काली माता चं दर्शन घडलं.. एका हातात झाडू, एका हातात लाटणं, एका हातात गरम गरम उलथनी आणि एका हातात