नमस्कार, मी मंदार मिलींद कुळकर्णी घेऊन आलो आहे माझ्या आवडत्या कवितांचे रसग्रहण! मराठी भाषेला अनेक सुंदर कवितांनी समृद्ध केले आहे. त्या महान कवींच्या काव्य विश्वाची झलक देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कुठल्याही काव्याला गद्य रूपात आणल्यावर त्याची तीव्रता कमी होऊ शकते व जे म्हणायचे आहे त्याच्या अर्थात फरक पडू शकतो हा धोका पत्करून आपल्यासमोर रसग्रहण मांडतो आहे. आपल्याला माझ्याकडून कुठल्या कवितेचे रसग्रहण वाचायचे असल्यास मला नक्की कळवा!