भूतकाळातील गडद सावल्या त्यांच्या आयुष्यावर किती खोल परिणाम करतील?त्यांच्या नात्याला नवे वळण मिळेल? की कोणाचे तरी आयुष्य या वणव्यात भस्मसात होईल?कधीकाळी तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा तो.आणि त्याच्या भावनांची जराही कल्पना नसलेली स्वच्छंद फुलपाखरासारखी ती…प्रेम, वेदना आणि भूतकाळाच्या सावल्यांत अडकलेली एक अनोखी कहाणी… ########पूर्ण सभागृह अगदी ठसा ठस भरलं होतं.... पूर्ण सभागृहाच्या नजरा फक्त तिच्यावर होत्या.... पण ती मात्र तिच्या विश्वात दंग होती..... चंद्रा ... नावातच तेवढ सौंदर्य होत..... पण नावापेक्षा जास्त ती सुंदर होती... तिच्या पायातले ते घुंगराचे चाळ.... अंगावरची रेशमी साडी... आणि गाण्याच्या प्रत्येक ओळीवर थिरकणारी ती..... ती म्हणजे चंद्रा .... एक