एक व्यक्ती निमूटपणे सगळे ऐकत होती... मनात राग असला तरी ती ते दाखवू शकत नव्हती...तिच्या मनात विचार येऊ गेला... "निशेचे मंद चांदणे आकाशी चमकूदेत..सगळ्यांना स्वप्नांच्या जगात रमू देत... मग मी डाव साधेल.. "नियती ने एक प्रस्ताव मांडला.." आता मुंबई मध्ये बरेच शहर येतात.. पण मुख्य शहर म्हणजे..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,भायकळा,दादर, पण तो इथे कुठे राहणारच नाही.. असे कोणतेतरी ठिकाण किंवा शहर असेल जिथे कोणी त्याच्यावर संशय घेणारच नाही... आणि त्याचा नक्कीच बंगला वैगरे असणार.. "" पण बंगल्यात राहायची जोखीम का घेईल तो? "आरोहीने सवाल टाकला.." बंगला असा तसा मुळीच नसणार.. एकतर तो बाहेरून पडका वाटणाऱ्या बंगल्यात असेल, नाहीतर जंगलाच्या ठिकाणी..