झपाटलेला वाडा - भाग 9

  • 648
  • 270

झपाटलेला वाडा - भाग 9: शापित सोन्याचा शापमैदानात एक माणूस मेला होता. सोन्यासाठी. त्याच जागी जिथे शंभर वर्षांपासून बळी जात होते. इतिहास परत घडला होता. सोन्याने परत बळी घेतला होता.पोलिसांनी ते सोनं जप्त केलं. पाच हंडा नाही, दोन हंडा निघालं होतं. पण त्याची किंमत पन्नास कोटी. लोखंडी पेटीत भरून पोलिसांच्या गाडीत टाकलं. पोलीस स्टेशनला निघाले. पण वाड्याच्या वेशीवरच ट्रकने धडक दिली. पोलिसांची गाडी पलटली. दोन पोलीस जागीच मेले. पेटी रस्त्यावर पडली, उघडली. लोकांनी लुटायला सुरुवात केली. परत भांडण. परत एकाचा खून. फावड्याने.तीन दिवसात तीन मृत्यू. एकाच सोन्यासाठी.आर्यनने हे ऐकलं तेव्हा त्याचा थरकाप झाला. तो म्हणाला, हे सोनं नाही, हा शाप