झपाटलेला वाडा - भाग 13

  • 477
  • 138

झपाटलेला वाडा - भाग 13: पाण्यातला हातसोन्याचा हात आर्यनचा पाय पकडून ओढत होता. घट्ट. बर्फासारखा थंड नाही, आगीत तापलेल्या लोखंडासारखा गरम. गोदावरीचं काळं पाणी उकळत होतं. बुडबुडे येत होते. कारण सोनं वितळत होतं, पाणी तापत होतं.आर्यन ओरडत होता, वाचवा मला कोणीतरी वाचवा माझा पाय जळतोयहरिभाऊने धावून त्याचे दोन्ही हात पकडले. मागे ओढू लागला. पण त्या सोन्याच्या हातात माणसाची ताकद नव्हती, शंभर वर्षांच्या शापाची ताकद होती. आर्यनचे पाय पाण्यात गेले. गुडघ्यापर्यंत. कंबरपर्यंत. तो हळू हळू बुडत होता.पाण्यातून आवाज येत होता. दहा आवाज एकत्र, पण आता ते रडत नव्हते, हसत होते.ये... तू अकरावा बळी... तू आमच्यात ये... आम्ही दहा जण आहोत... तू