नाते जन्मापलिकडचे - भाग 19

  • 1.1k
  • 366

बरेच दिवस शिवने वैदेहीला मेसेज केलेला नसतो. तिला वाटतं असते कदाचित तिच्यागेल्या वेळीच्या बोलण्यावर तो विचार करत असेल.ती देखील काही त्याला मेसेज करत नाही.खरंतर आतून तिला वाटत असते आपण मेसेज करावा खूप काही बोलावं पण ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असते.पण काही दिवसांनी ती स्वतःच त्याला मेसेज करते."काय शेठ... कित्येक दिवस मेसेज नाही काही नाही. विसरला कि काय तूझ्या बेस्टी ला?"त्याचा तासाने रिप्लाय येतो "नाही गं तुला कसं विसरेल.. कामात होतो म्हणून""अच्छा, माझ्या बोलण्यावर विचार केला का?""हा केला पण मला नाही वाटतं मी तसं करतोय.. तुझा भ्रम असावा "त्याच्या त्या हट्टी स्वभावाला बघून तिने सुस्कारा सोडला. शेवटी तिने त्याला शेवटचं वाक्य