Complicated Love - 7

  • 420
  • 135

भाग 6 वरून पुढे अदितीने गाडीचा वेग वाढवत ईशांतच्या गाडीचा  पाठलाग करायला सुरवात केली. ईशांत भरघाव वेगाने जीवाची कसलीही पर्वा न करता त्या तरुणाचा पाठलाग करीत होता. नागमोळी वळणे, लोकांचा गर्दीप्रवाह याला तुफान वेगाने मागे टाकत ईशांत त्या तरुणाला पकडण्याचा अतोनात प्रयत्न करीत होता. त्याची भुवया आकसून तीक्ष्ण झालेली नजर क्रोधाच्या आगठिणग्या बरसवीत होती. अदितीच्या स्कुटीनेही जोर धरला होता. वाऱ्याच्या झोतामुळे तिचे रेशमी केस अस्तव्यस्त होऊन तोंडावर जमा झाले होते. स्कुटीच्या हॅण्डलला पकडलेल्या  तिच्या गोऱ्यापान हातावर सकाळचे बारीकसे दवाचे थेंब साचले होते. आपली नजर रोखून ती ईशांतच्या मागावर होती. त्या तरुणाची दुचाकी एका पडक्या कारखान्याजवळ थांबली. मागून येणाऱ्या अर्जुनला पाहताच  त्या