राधा कृष्ण…एक अपूर्ण राहिलेली आठवण

  • 399
  • 114

राधा कृष्ण…एक अपूर्ण राहिलेली आठवण एक मुलगी होती…ग्रॅज्युएशनचे दिवस होते,आयुष्य नुकतंच कुठेतरी वळण घेत होतं,आणि अशातच तिची ओळख झाली…काहीच विशेष घडलं नव्हतं,फक्त ती भेटली होती…पण काही माणसं ना,आयुष्यात येताना काहीच सांगून येत नाहीत,आणि जाताना मात्रआयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी देऊन जातात…ती सुंदर होती,गोरा रंग, लांब केस,आणि एक गोडसं हसू…ज्याने माझ्या साध्याशा दिवसांनाहीकाहीतरी खास बनवलं होतं…तिचं हसणं म्हणजेजणू एखाद्या शांत सकाळीपहिलं ऊन अंगावर पडावं,आणि तिचं माझ्याकडे पाहणं म्हणजेजगात त्या क्षणीमाझ्याशिवाय तिला दुसरं काहीच दिसत नसावं…आम्ही एकमेकांनाराधा-कृष्ण म्हणायचो…मोबाईलमध्येही एकमेकांचे नंबरत्याच नावाने जपले होते…किती निरागस होतं ना ते प्रेम,ना भविष्याची फारशी चिंता,ना जगाला काही सिद्ध करायचं होतं,फक्त एकमेकांशी बोलायचं होतं,आणि बोलता बोलताकधी तास निघून जायचे,हे