मदर टेरेसा- शांती दूत

(17)
  • 21.1k
  • 11
  • 5.2k

मदर टेरेसांचा उल्लेख व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच करावा लागेल. जे मनात येत गेल ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडलं... हा मनस्वीपणा इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी हि व्यक्ती किती मोठी होती. त्यांच्या राहणीमानात कमालीचा साधेपणा होता. त्यांचा चेहरा कमालीचा सात्विक होता. जेमतेम ५ फुट उंची असलेली लहान मूर्ती. मुळचा वर्ण गोरा गुलाबी.. डोळे बारीक आणि तपकिरी! चेहऱ्याच्या मानाने नाक मोठ! अंगावर पांढरी साडी जाड्या भरड्या सुताची. साडीला निळे काठ! अंगात लांब बाह्यांचा पांढरा ब्लाऊज. डाव्या खांद्यावर क्रूस त्यावरच ख्रिस्त आट वळलेला. त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ! हृदय विकाराचे २ झटके येऊन गेल्याच कुठ्तही चिन्ह हालचालीत नाही! त्यांची मूर्ती लहान होती पण काम मात्र मोठ होत.