तानाजी उठ,वैरण आणायला जायचे आहे ,असा आवाज कानावर पडताच तानाजी खडबडून जागा झाला आणि दावं,गोणपाट कुठे आहे विचारायला लागला.हे बघून तिलोत्तमा खळखळून हसायला लागली. रात्री उशिरा घरी आला आहे. , तानाजीची आई तिलोत्तमाला बोलली.तिलोत्तमा तानाजीकडे बघून, होय रे,इतकं काम असतं का तुला? , असे चिडवण्याच्या सुरात बोलली. तुला काय माहित, कंपनीत किती काम असतंय,प्रोडक्शन ऑर्डर काढायची असते आणि प्रॉडक्शन प्लॅन कम्प्लीट करायचे असते त्याशिवाय घरी जायचं नसतं,त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करत होतो.रात्री एक वाजता घरी आलोय आणि तू माझी चेष्टा करते काय इतकी कंपनीची काळजी असती तर कंपनीचे नाव घेतल्यानंतर उठला असतास.'वैरण' नाव घेतल्यानंतर लगेच कसं काय उठला? ते जाऊ दे,तू आज इकडे कशी काय? तानाजी आंथरूणाच्या घड्या घालत बोलला. तानाजी

Full Novel

1

वैरण भाग-I

तानाजी उठ,वैरण आणायला जायचे आहे ,असा आवाज कानावर पडताच तानाजी खडबडून जागा झाला आणि दावं,गोणपाट कुठे आहे विचारायला लागला.हे तिलोत्तमा खळखळून हसायला लागली. रात्री उशिरा घरी आला आहे. , तानाजीची आई तिलोत्तमाला बोलली.तिलोत्तमा तानाजीकडे बघून, होय रे,इतकं काम असतं का तुला? , असे चिडवण्याच्या सुरात बोलली. तुला काय माहित, कंपनीत किती काम असतंय,प्रोडक्शन ऑर्डर काढायची असते आणि प्रॉडक्शन प्लॅन कम्प्लीट करायचे असते त्याशिवाय घरी जायचं नसतं,त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करत होतो.रात्री एक वाजता घरी आलोय आणि तू माझी चेष्टा करते काय इतकी कंपनीची काळजी असती तर कंपनीचे नाव घेतल्यानंतर उठला असतास.'वैरण' नाव घेतल्यानंतर लगेच कसं काय उठला? ते जाऊ दे,तू आज इकडे कशी काय? तानाजी आंथरूणाच्या घड्या घालत बोलला. तानाजी ...Read More

2

वैरण भाग-II

वैरण भाग-II  बादलीतून पाणी घेऊन तो म्हशींच्या जवळ आला.त्यांना पाणी पाजले.पुन्हा डोक्याला हात लावून विचार करत बसला.विचाराचा एकच 'वैरण'.काही सुचत नव्हते.डोक्यात विचारांचं काहूर माजले होते.डोकं फुटायची वेळ आली.तानाजीने एक मोठा श्र्वास घेऊन सुस्कारा सोडला आणि उठून घरी गेला.घरात येऊन कॉटवर आराम करण्यासाठी पडला.पण विचार चालूच होते.विचार करता करता संध्याकाळचे सहा कधी वाजले समजलेच नाही.जसजसा वेळ जात होता तसतसा तो अजून बेचैन होत होता.त्याला बिना वैरणीची दावण,भूकेलेल्या म्हशी, त्यांची वैरणीसाठीची तरफड डोळ्यासमोर दिसत होती.तानाजीचं मन तळमळत होतं.त्याला ना भूक लागत होती ना झोप.वेळ जात होता, सहा,सात,आठ..., रात्रीचे दोन वाजले.त्याने आदल्या दिवशी रात्री जेवण केले होते, त्यानंतर तो जेवला नव्हता.वैरणीच्या ...Read More

3

वैरण - III

वैरण भाग-III  तानाजीचे मन गाव सोडायला तयार नव्हते.पण करणार काय, बघितलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण धुळीस मिळाल्या होत्या.शिवाय कमावणारे गमावले होते.बाबा गेल्यानंतर दोन दिवस शेजारच्या लोकांनी जेवण पुरवलं.त्यानंतर स्वत:च्या घराची काळजी सत:च करावी लागते. आईच्या काळजीखातर नाईलाजाने तो गाव सोडायला तयार झाला. वैरण भाग-II पासून पुढे..., तानाजीच्या आईने गावकडे आलेले संघर्षमय अनुभव सांगितल्यानंतर ती पुढे बोलायला लागली, "तानाजी आणि मी पुण्यात आलो.आबाकाकांच्या मित्राने राहण्याची सोय केली पण पंधरा दिवस कामाचा पत्ता नव्हता.शिवाय इथे आमच्या ओळखीचं कोणी नव्हतं आणि त्यात........." "त्यात माझी आणि तानाजीची भेट झाली.त्याला बघितल्यावर मला जाणवले की त्याला कामाची नितांत गरज आहे.मग मी माझ्या ओळखीने त्याला काम मिळवून ...Read More