स्वप्नाचा पाठलाग

(25)
  • 27.3k
  • 8
  • 10.5k

निनाद त्याच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत

New Episodes : : Every Saturday

1

स्वप्नाचा पाठलाग!--- भाग १

निनाद त्याच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत ...Read More

2

स्वप्नाचा पाठलाग!-----भाग २

"स्वराली, मी तुम्हाला मुद्दाम एकटीला बोलावलंय. काही गोष्टींचं स्पष्टीकरण आणि निनादच्या मानसिक अवस्थे संबंधी तुमच्याशी चर्च्या करायची आहे." डॉ. निनादचे केस पेपर पाहत म्हणाले. "बोला डॉक्टर." स्वराली डॉक्टरांचा गंभीर टोन एकून अस्वस्थ झाली होती. "प्रत्यक माणसाला कशाची ना कशाची भीती वाटतच असते. त्यात काही वावगं नाही. एका ठराविक मर्यादेपर्यंत 'भीती' हे नैसर्गिक कवच असते. कारण ते धोक्याची सूचना देत असते. पण हीच भीती जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा, तो 'फोबिया' होतो. ""डॉ. मला तुमच्या शास्त्रातलं काही कळत नाही! मला फक्त निनादला काय झालाय, तेव्हडंच सांगा!" स्वरालीला डॉक्टरांच्या प्रस्तावनेत काही रस नव्हता. "निनादला 'चिरोपट्ट फोबिया ' झाला असावा असा माझा अंदाज ...Read More

3

स्वप्नाचा पाठलाग!-----भाग ३

डॉ. मुकुलनी भडक रंगाच्या वटवाघूळीच्या चित्राचे पुस्तक निनाद आणि स्वराली समोर टाकले. "हे वटवाघूळीच्या लाईफ सायकलवरचे पुस्तक आहे. निसर्गात प्राणी असतात त्यातलाच हा एक. हा निशाचर प्राणी आहे. म्हणजे आपले भक्ष रात्री शोधतो. त्यात घाबरण्या सारखं काहीच नाही. घोडा, कुत्रा, मांजर असते तसाच हा हि एक प्राणी आहे!" डॉ. मुकुल एकी कडे माहिती सांगत होते, तर दुसरीकडे त्यांचे लक्ष निनाद बसला होता त्याच्या मागच्या भिंतीवरील मॉनिटरवर होते. निनादच्या तर्जनीला लावलेल्या सेन्सरमुळे त्याचे बीपी, प्लस, ईसीजी डॉ. मुकुलना दिसत होते. डॉक्टरांनी वटवाघुळीनची संपूर्ण लाईफ सायकल समजावून सांगितली. बीपी -प्लसमध्ये धोकादायक फरक पडला नव्हता. डॉक्टरांसाठी तो सकारात्मक संकेत होता. मग त्यांनी ...Read More

4

स्वप्नाचा पाठलाग!-----भाग ४

"निनाद, तुम्हाला 'शकू' नावाची कोणी बाल मैत्रीण होती का?" डॉ. मुकुलनी सरळ मुद्यालाच हात घातला. या प्रश्नाने निनाद सटपटला. याला 'शकी' समजली तर? "हो! पण शाळेतली! का?""अशात ती तुम्हास भेटते का?""नाही! गाव सुटले तशी ती पुन्हा भेटली नाही!" डॉक्टरांचा आय कॉन्टॅक्ट टाळत निनाद म्हणाला. डॉ. मुकुलनी तो खोटं बोलत असल्याचे तात्काळ ओळखले. खरे तर स्वरालीचं शकीबद्दल त्याला विचारणार होती. पण ज्या अर्थी तो हुन सांगत नाही त्या अर्थी ते फारसे महत्वाचे नसावे, असे तिला वाटले. " तुम्हाला म्हणे एकच स्वप्न वारंवार पडत! असे स्वराली म्हणत होत्या!""तस ते फारस विशेष नाही! फार लहानपणा पसन ते कधीतरी पडतंय!" निनाद पुन्हा खोटं ...Read More