तू जाने ना

(90)
  • 121.7k
  • 12
  • 73.6k

तू जाने नाभाग - १ "सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता आणि त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊन पाहतो तर गायब ... !! तुला माहितीय ना, ते गळ्यात नसेल ना तर तो किती अनइजि फील करतो, आता गाणं कसं गाणार तो....? प्लिज कुछ तो करो सुहान, नही तो ये पुरा शो खराब हो जायेगा.... आता तूच काहीतरी करू शकतेस... यू नो वेरी वेल हीम, ही इज " दि कबीर कपूर " आणि त्याच्या रागावर नियंत्रण तुझ्याशिवाय इतर कोणीच नाही ठेऊ शकत... तुझ्याशिवाय तो कोणाचं ऐकणार पण नाही....

New Episodes : : Every Thursday

1

तू जाने ना - भाग १

तू जाने नाभाग - १ सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊन पाहतो तर गायब ... !! तुला माहितीय ना, ते गळ्यात नसेल ना तर तो किती अनइजि फील करतो, आता गाणं कसं गाणार तो....? प्लिज कुछ तो करो सुहान, नही तो ये पुरा शो खराब हो जायेगा.... आता तूच काहीतरी करू शकतेस... यू नो वेरी वेल हीम, ही इज दि कबीर कपूर आणि त्याच्या रागावर नियंत्रण तुझ्याशिवाय इतर कोणीच नाही ठेऊ शकत... तुझ्याशिवाय तो कोणाचं ऐकणार पण नाही.... ...Read More

2

तू जाने ना - भाग २

मागील भागात -पण त्या परिवारात अनावधानाने शामिल व्हायला आलेला तो कबीर... तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग, तिचं न भूतो भविष्यति असणारा तिचा एकेकाळीचा प्रियकर... हो प्रियकर... जो आपल्याला प्रिय असतो त्यालाच प्रियकर बोलतो ना आपण...!______________________________________तू जाने नाभाग - २असाच एक कबीर नावाचा प्रियकर जेव्हा तिच्या आयुष्यात आला आणि आयुष्यातला सगळा खेळच बदलला... कामाशिवाय कशालाच महत्व न देणारी सुहानी कशी काय त्याच्या प्रेमात पडली, हे आजवर ना राहुलला समजलं, ना रितूला... मालिकांच्या माध्यमातून लोकांच्या मनात प्रेम, मोह, माया, निर्माण करणाऱ्या सुहानीच्या स्वतःच्या हृदयात मात्र कधीच इतरांना द्यायला प्रेम नव्हतं... प्रेमात पडायला समोर माणूस पण तसाच लागतो म्हणा... हो, कबीर होता ...Read More

3

तू जाने ना - भाग ३

भाग - ३आज ऑफिसमध्ये सुहानी कबिरशी जे काही वागली होती, ते आठवून ती थोडं विचित्रच फील करत होती... कोणाला घालून पाडून बोलणं हे तर तिच्या स्वभावात नव्हतं पण वयाच्या १२-१३ व्या वर्षात त्या निरागस डोळयात तो द्वेष, तो राग तिचे बाबाच देऊन गेले होते... आणि त्यात आज भर म्हणजे सकाळीच डॉक्टर अमेय साठे ह्यांनी तिच्या आईच्या खालावत चाललेल्या तब्येतीबद्दल सांगितलं होतं... "त्यांनी जगण्याची आशाच सोडली तर त्यातून त्या वाचणं शक्य नाहीए..." डॉक्टर साठ्यांचे हेच शब्द तिच्या कानात घुमत होते... आपली आई आता जीवन आणि मृत्यूच्या दारावर तिच्या आयुष्याची कमी होत जाणारी वेळ बघत उभी आहे, ह्या जाणिवेनेच तिने आज ...Read More

4

तू जाने ना - भाग -४

भाग - ४ दरवाजाची बेल वाजवताच विजूने दरवाजा उघडला... मॉम आणि दादी पण हॉल मध्येच बसल्या होत्या... " कपूर आहेत का...? " रितूने विचारताच विजूने कबिरच्या मॉमला कबिरला दोन मुली भेटायला आल्याचं सांगितलं... दादी आणि मॉम एकमेकिंकडे आश्चर्याने बघू लागल्या..." विजू, येऊ दे त्यांना आत...? " रुद्र जिन्याने खाली उतरत म्हणाला... त्यांना आत घेऊन विजू किचनमध्ये निघून गेला..." हॅलो मी रितू बर्वे आणि ह्या मॅडम सुहानी दीक्षित, दीक्षित प्रॉडक्शन लिमिटेडच्या एम डी... " रितूने ओळख करून दिली... " हॅलो... मी रुद्र कपूर... ही माझी दादी आणि ही मॉम (रुद्रची आई नसल्याने तो कबिरच्याच आईला मॉम बोलायचा)... बसा ना...! " रुद्रने शेखहॅन्ड करत ...Read More

5

तू जाने ना - भाग ५

भाग - ५" हॅलो अरे आहेस कुठे...? " " बस क्या, तुमने पुकारा और हम चले आएsss..." कबिरने गाणं एन्ट्री घेतली आणि पंकजला बिलगला..." hey ये हुई ना बात...? " त्याला पाहून पंकज पण खूष झाला..." सो दुल्हेराजां सब कुछ सेट ना... हमारी होनेवाली भाभी कहाँ हैं...? " कबीर त्याला डोळा मारत म्हणाला..." अरे ती आत्ताच संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला गेली... भेटवतो नंतर... तुझा प्रवास कसा झाला...? " पंकज" हम्मम मस्त..." कबिरच्या डोळ्यासमोर सुहानीचा चेहरा येताच त्याचं वाक्य बदललं... " अरे विचारूच नकोस... हेक्टिक..."? " का रे...? " पंकज " नाही काही नाही, नंतर सांगतो... जाम दमलोय रेस्ट करतो, उद्या शूट पण ...Read More

6

तू जाने ना - भाग ६

भाग - ६रिसेप्शनला स्टेजवर दोघांनी एकत्रच जाऊन काव्या आणि पंकजसोबत फोटो काढले... संपूर्ण लग्न समारंभात त्या दोघांची जोडी इतकी दिसत होती की फोटोग्राफर ने त्यांच्या कळत नकळतच त्यांचे बरेच फोटो काढले... लग्न निर्विघ्नपणे पार पडलं... सगळे परतीच्या प्रवासाला निघाले... कबिरने सुहानीला विचारून एकच कॅब बुक करून ठेवली होती... कारण त्या दोघांचं रिटर्न तिकीट पण एकाच फ्लाइटचं होतं... " माझ्यासोबत यायचंय ह्याला माय फूट...? इथून निघशील तर येशील ना...! मला त्रास देणारा आता स्वतःचं पोट धरून त्रास सहन करत बसणार...? " सुहानी स्वतःचे कपडे बदलताना हा एकच विचार करत होती... तिने तरीही मुद्दामून त्याला निघायचं का हे विचारायला कॉल केला पण ...Read More

7

तू जाने ना - भाग ७

भाग - ७कबिरला रुपचा त्यादिवशी सतत फोन येत होता... विचारात बुडालेल्या कबीरने वैतागतच तिचा कॉल रिसिव्ह केला..." हां बोल, आहे...? " त्याचा राग त्याच्या मुखावाटे निघत होता... रूप थोडी घाबरलीच... पहिल्यांदाच तिने कबिरला तिच्यावर इतक्या मोठ्याने खेकस्ताना ऐकलं होतं... तिला पुढे काय बोलावं ते सुचतच नव्हतं... कबिरलाही काही सेकंद गेली... तो थोडा शांत झाला आणि तिच्याशी बोलू लागला... त्याने जाणीवपूर्वक तिला सुहानीबद्दल सांगणं टाळलं... तसही तिला सांगून त्याला आणखी प्रॉब्लेम्स वाढवायचेही नव्हते... फोन वर बोलून त्यांचं संध्याकाळी भेटायचं ठरलं... दुपारी जेवून झाल्यावर कबिरची मॉम, दादीला दोन दिवसापासून बरं नसल्याचं त्याला सांगत होत्या... हे ऐकून तो दादीच्या खोलीत धावला... दादी आराम करत ...Read More