प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी

(53)
  • 43.4k
  • 11
  • 19.1k

सॅटरडे नाईट आऊट राघवला जास्त काही मानवलेलं नसतं.. दोन्ही हाताने आपलं जड झालेलं डोकं त्यातल्या त्यात दाबुन मेंदूतून जाणवणारे ठणके पुन्हा आतल्या आत कुठे तरी दाबुन ठेवण्याचा त्याचा प्रयत्न चालु असतो.. "गुड मॉर्निंग माय डिअर सन..", नेहमी प्रमाणे वाफाळलेल्या चहाचा कप राघव समोर ठेवत त्याचा डॅड किचनमध्ये जायला निघतो.. "डॅड तु माझ्यावर कधीच का नाही रे रागवत... ",राघव कपातून बाहेर पडणाऱ्या वाफा बघतच आपल्या डॅडला विचारतो.. राघवचे केस विस्कटत जास्त काही न बोलता डॅड सरळ किचनमध्ये निघुन जातो.. "डॅड.. ", राघव पुन्हा त्याला आवाज देत त्याच्या सोबत किचनमध्ये जातो.. "तुझ्या आवडीचा व्हाईट एग आम्लेट बनवतोय.. आवडतं ना तुला?? "हम्मम.. ",

Full Novel

1

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 1

सॅटरडे नाईट आऊट राघवला जास्त काही मानवलेलं नसतं.. दोन्ही हाताने आपलं जड झालेलं डोकं त्यातल्या त्यात दाबुन मेंदूतून ठणके पुन्हा आतल्या आत कुठे तरी दाबुन ठेवण्याचा त्याचा प्रयत्न चालु असतो.. "गुड मॉर्निंग माय डिअर सन..", नेहमी प्रमाणे वाफाळलेल्या चहाचा कप राघव समोर ठेवत त्याचा डॅड किचनमध्ये जायला निघतो.. "डॅड तु माझ्यावर कधीच का नाही रे रागवत... ",राघव कपातून बाहेर पडणाऱ्या वाफा बघतच आपल्या डॅडला विचारतो.. राघवचे केस विस्कटत जास्त काही न बोलता डॅड सरळ किचनमध्ये निघुन जातो.. "डॅड.. ", राघव पुन्हा त्याला आवाज देत त्याच्या सोबत किचनमध्ये जातो.. "तुझ्या आवडीचा व्हाईट एग आम्लेट बनवतोय.. आवडतं ना तुला?? "हम्मम.. ", ...Read More

2

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 2

बी स्ट्रॉंग. मेघनाच्या आठवणीने अस्वस्थ असणाऱ्या राघवला त्याच्या डॅडच्या ह्या दोन शब्दांचाच काहीसा आधार होता. ऑफिसमध्ये जायचय ह्या राघवच मन आज कुठेच लागत नव्हतं. त्यात आज खुप महिन्यांनी त्याचं मेघनासोबत ऑफिसमधील मिटिंग दरम्यान इंटरेक्शन होणार होतं. आजचा दिवस कसा जाईल ह्याचा विचार करत राघव आरश्यात बघत आपल्या केसांवर हेअरब्रश फिरवत होता. केस विंचरून होताच हेअरब्रश नेहमी प्रमाणे बेडवर फेकत तो ब्रेकफास्ट करायला निघून गेला. “डॅड येतो रे”, डॅडला आवाज देत राघव घाईघाईतच घराबाहेर पडला. डॅडने बाहेर येऊन बघितले तर प्लेटमधला नाश्ता तसाच होता. “हे राघवबेटा. बेस्ट ऑफ लक. बी स्ट्रॉंग. बाय”, बाल्कनीतून नेहमीप्रमाणे राघवला हात दाखवतच त्याचा डॅड म्हणाला. ...Read More

3

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 3

ट्रीपवरुन घरी येताच मेघनाने मारलेली मिठी आठवुन राघव गालातल्या गालात हसतो. रात्रीचे दोन वाजुन गेले तरी राघव जागा असतो उशिरा त्याला मेघनाच्या आठवणीत झोप लागते. दुसऱ्या दिवशी मेघना नेहमीपेक्षा लवकरच कॉलेजमध्ये येते. पण तिला राघव कुठेच दिसत नव्हता.. कॉलेजमध्ये गोंधळ चालु असतो. नोटीस बोर्डभोवती गर्दी असते. "एवढ्या गर्दीतुन कळणार कसं की कसली नोटीस आहे??" जिया तोंड पाडतच मेघनाला बोलते. "गर्दी कमी झाली की बघुयात", मेघना तक्रारीवरचा तोडगा काढत जियाला बोलते. तोच गर्दीतुन राघव आणि श्री बाहेर येताना तिला दिसतात.. "ह्ये राघव ! कसली नोटीस लागलीय?”, जिया राघव दिसताच त्याला विचारते. "कॉलेज थ्रू इंटरडान्स कॉम्पिटीशन आहे. जो कोणी इंटरेस्टेड असेल ...Read More

4

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 4

"मम्माssss.. एक गोंडस अशी साधारण चार पाच वर्षांची सुंदर आणि गोड अशी परी मेघना जवळ पळतच जात असते.." तिला मेघला बिलगताना बघुन आपल्या शरीरातुन कोणी तरी प्राणच काढुन घेतलेत अस काहीस राघवच झालं असत.. मेघना राघवकडे बघतच त्या गोंडस अश्या परीच्या गालावर हात टेकवत तिला उचलुन घेते.. नकळत का होईना राघवचे डोळे पाणावले असतात..मनात एक वेडी आशा ठेवुन तो जीची वाट बघत होता ती त्याच्या हृदयातील घरात परतून काही येणार नसते ह्याची त्याला जाणीव झाली असते.. आयुष्य भरासाठी त्याच हृदय हे रिकामीच रहाणार असत.. ऑफिसमध्ये लहान क्युट अशी छोटी मुलगी आली हे बघुन सगळेच तिची ओळख करायला तीच्या भोवती ...Read More

5

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 5

वाइ डिड यू ब्रेक माई हार्ट वाइ डिड वी फॉल इन लव वाइ डिड यू गो अवे, अवे, अवे, दिल मेरा चुराया क्यूँ जब यह दिल तोड़ना ही था हमसे दिल लगाया क्यूँ हमसे मुँह मोड़ना ही था गिटारच्या तारा छेडत, मेघनाच्या आठवणीत गाणं गात राघव एकटाच आपल्या रूमच्या गेलरीत बसला असतो.. गाणं गाताना कंठ अगदी दाटून आला असतो.. युक्ताच गोड अस बोलणं आठवुन त्यातल्या त्यात तो गालातल्या गालात हसत असतो.. श्री मेघनाला घेऊन एका रेस्टोरेंटमध्ये जातो.. "राघव फोन का नाही उचलत आहे??" श्री चिडतच बोलतो.. "तो दुपार नंतर ऑफिसमध्ये दिसलाच नाही मला" मेघना बोलते.. "बसला असेल परत ड्रिंक ...Read More

6

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 6 - अंतिम

"राघsss", मेघना पळतच राघवजवळ जाते. श्री च्या कुशीत अगदी डोळे मिटुन शांत झाला असतो तो.. "ए राघव, काय मूर्खां केलंस तु हे.. उठ बघु", श्री रडतच बोलतो. "श्री ह्याचे हार्ट बिट्स जाणवतायत मला", राघवच्या छातीवर डोकं टेकतच मेघना बोलते.. "अंकलsss" श्री मोठ्यानेच ओरडतो. राघवचे डॅड राघवच्या रूममध्ये येतात.. आपल्याला मुलाला अश्या अवस्थेत बघुन ते घाबरून जातात.. "अंकल गाडी काढा.. लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं ह्याला.. मी आणि मेघना मिळुन ह्याला खाली घेऊन येतो.. तुम्ही अस बघत नका बसु लेट्स गो...." श्री जोरातच ओरडतो. राघवच्या वडिलांना खर तर सुधरत नसत.. त्यातल्या त्यात स्वतःला सावरत ते तिथु निघतात. सगळेच मिळुन त्याला हॉस्पिटलमध्ये ...Read More