अगा जे घडलेचि आहे!

(8)
  • 16.8k
  • 2
  • 6.1k

आमच्या घरच्या हॉलमधला टीव्ही.. त्याच्यावर एक हिंदी सिनेमा सुरू. माझी छोटी माझ्या मांडीवर बसून पाहतेय.. एकाएकी म्हणाली, "बाबा, हे हिंदी सिनेमावाले काय पण दाखवतात. असे कधी होते काय? मी मोठी झालीय आता.. मला म्हायती सगळे खोटेखोटे आहे ते!" मुलीचे वय वर्ष पाच! घरातलेच कुणी मागे म्हणालेले ती परत पोपटपंची केल्यासारखे बोलतेय! पण खरे सांगतो हिंदी सिनेमा नाहक बदनाम झालाय! असे कधी होते का? असे म्हणजे कसे? कसे ही असो.. होते! म्हणजे होऊ शकते! नाही विश्वास बसत? मग वाचा हे.. खरेतर 'खरीखुरी' सत्यकथा! कोण म्हणतो सिनेमातल्या गोष्टी सत्यात येत नाहीत म्हणून? खरेतर प्रत्यक्ष आयुष्यात सिनेमाहूनही गंमतीदार गोष्टी घडतात.. घडू शकतात. सत्य कल्पनेहूनही जास्त रोचक असू शकते. एका तामिळ का कुठल्याश्या दाक्षिणात्य सिनेमात कुणाचे ह्रदय एकाएकी उडत दुसऱ्या कुणा पेशंटच्या छातीत जाऊन बसते असे काही पाहिलेले आठवते. आपल्या देदीप्यमान कर्तृत्वाच्या ऐतिहासिक पूर्वजांच्या काळी हे घडलेच नसेल असे छातीठोक कुणी सांगू शकेल? म्हणजे पुराणातली वांगी पुराणात ठेवून त्यांचे निरूत्साहाच्या भरात भरीत करणारे भारतीय आम्ही! त्या वारशाचा अभिमान बाळगत हे असले काही घडू शकते एवढेच काही सांगायचे इकडे. त्यामुळे आता मूळ मुद्द्यावर यावयास हरकत नाही! म्हणजे झाले असे.. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही..

Full Novel

1

अगा जे घडलेचि आहे! - 1

१ आमच्या घरच्या हॉलमधला टीव्ही.. त्याच्यावर एक हिंदी सिनेमा सुरू. माझी छोटी माझ्या मांडीवर बसून पाहतेय.. एकाएकी म्हणाली, "बाबा, हिंदी सिनेमावाले काय पण दाखवतात. असे कधी होते काय? मी मोठी झालीय आता.. मला म्हायती सगळे खोटेखोटे आहे ते!" मुलीचे वय वर्ष पाच! घरातलेच कुणी मागे म्हणालेले ती परत पोपटपंची केल्यासारखे बोलतेय! पण खरे सांगतो हिंदी सिनेमा नाहक बदनाम झालाय! असे कधी होते का? असे म्हणजे कसे? कसे ही असो.. होते! म्हणजे होऊ शकते! नाही विश्वास बसत? मग वाचा हे.. खरेतर 'खरीखुरी' सत्यकथा! कोण म्हणतो सिनेमातल्या गोष्टी सत्यात येत नाहीत म्हणून? खरेतर प्रत्यक्ष आयुष्यात सिनेमाहूनही गंमतीदार गोष्टी घडतात.. घडू शकतात. ...Read More

2

अगा जे घडलेचि आहे! - 2

२. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परतलो. दरवाजा उघडाच होता. आतून कुणी बाहेर यायचे चिन्ह दिसेना. झोपाळा रिकामाच होता. मी बेल तशी ती बाहेर आली. छानच दिसत होती. मी आत शिरणार तोच म्हणाली, "सॉरी. बाबांना अर्जंट जावे लागले गावी. त्यांच्या काकाचा मुलगा एकाएकी वारला. कालच गेले ते. एवढ्या तडकाफडकी जावे लागले ना की त्यांच्याशी पेपर्स बद्दल काही बोलूही नाही शकली ताई. तुम्ही ही फाईल तुमच्याकडेच ठेवा. सॉरी हां.. काल घाईत तुमचा नंबरही नाही घेतला तिने. उगाच खेप पडली तुम्हाला." उगाच खेपेचे काही नाही. तिला बघायला मी दररोज यायला तयार होतो. पण ही अशी का ती आणि तिने म्हणतेय? "चांगला तरणाताठा हो.. ...Read More

3

अगा जे घडलेचि आहे! - 3

३. मध्ये पंधरा एक दिवस गेले असावेत. मी आता ते सारे विसरून गेलो. म्हणजे तसे ठरवून टाकले मी की ते विसरलोय. खरेतर सहानींकडून फोन येणार होताच. मेंदूतही अडगळीचा कप्पा असावा त्यात सारे टाकून मी त्या अनामिक सुकन्येस विसरायचे ठरवून टाकले. आणि एके दिवशी सकाळ सकाळी सहानींकडून फोन आला. तिला विसरण्याचा निश्चय आनंदाने मोडत मोठ्या उत्साहाने फोन उचलला मी. पण त्या मंजूळ ध्वनी ऐवजी पलिकडून एका सहानींचा भसाडा आवाज.. "क्या हुवा पुत्तर.. आए नहीं तुम. ओ पापाजीके पेपर थे.." "अच्छा तो आप आ गए वापस जी?" "वापीस? हम कहां जाएंगे? हम तो इधरही है.. आज तो आ जाओ.. कितने दिनोंसे ...Read More

4

अगा जे घडलेचि आहे! - 4 - अंतिम भाग

४. अवि पुढे बरेच काही बोलला. माझी कथा इथेच संपायला हवी. पुढे घडण्यासारखे काय होते या गोष्टीत? पण नाही. सिनेमाचा उसूल आहे. त्यात हॅपी एंड व्हायलाच हवा! सारी गोष्ट त्यासाठी कितीही वळसे खात असली तरी चालते त्या गोष्टीत! हीरोला हीरॉईन मिळायलाच पाहिजे. शेवटच्या सीन मध्ये त्यांनी एकाच गाडीतून कुठे जायलाच पाहिजे आणि 'द न्यू बिगिनींग' वर 'द एंड' व्हायला पाहिजे. आणि या गोष्टीचा हीरो मी आहे! तेव्हा सुखांत व्हायलाच हवा! मी म्हटले ना जे घडते तेच दिसते सिनेमात. अशा गोष्टीचा अंत सुखांत होत असेल तर तसाच तो सिनेमात दिसणार नाही का? पुढे माझे जुळले ते बटाटेवडेवालीशीच! आणि ते ही ...Read More