शालिनीच काय चुकलं ?

(5)
  • 30.4k
  • 4
  • 12.1k

मार्च महिन्यातले दिवस. सर्व साधारण पणे वार्षिक परीक्षेचे दिवस. आज रवीशंकर शाळेमध्ये वार्षिक पारीक्षेचा शेवटचा दिवस होता. ९ वी च्या वर्गात फिज़िक्स चा पेपर चालू होता. शालिनी मॅडम वर्गावर होत्या. वर्गावर त्यांची बारीक नजर होती. तिसऱ्या रांगेतल्या निलेश कडे त्यांची नजर गेली आणि त्यांना काही तरी जाणवलं. त्या उठून निलेशच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. निलेश चपापला, लिहिणं थांबवून उगाचच विचार करतो आहे असा चेहरा करून बसला. मॅडम तिथेच उभ्या होत्या आणि निलेशला काय लिहावं हे सुचत नव्हतं. थोडा वेळ तसाच गेला. निलेश नुसताच बसून होता. अजून पांच मिनिटं झाली आणि शालिनी मॅडम नी निलेशला विचारलं “काय रे वेळ भराभर संपतो आहे आणि तू काहीच न लिहिता का बसला आहेस ?” “नाही मॅडम विचार करतो आहे.” – निलेश “ठीक आहे.” असं म्हणून मॅडम तिथून समोर गेल्या आणि समोर जाऊन दुसऱ्या रांगेत शिरल्या. निलेश नी आता कॉपी काढून लिहायला सुरवात केली होती. शालिनी मॅडम डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होत्या. रांगेच्या शेवटी जाऊन त्या वळल्या आणि पुढे जाऊन वळसा घालून निलेशच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. नीलेशनी लिहिणं चालूच ठेवलं पण आता त्याचा स्पीड मंदावला होता. मधूनच त्यानी मान वर करून मॅडम कडे पाहिलं.

Full Novel

1

शालिनीच काय चुकलं ? - भाग १

शालिनीचं काय चुकलं ? भाग १ मार्च महिन्यातले दिवस. सर्व साधारण पणे वार्षिक परीक्षेचे दिवस. आज रवीशंकर शाळेमध्ये वार्षिक शेवटचा दिवस होता. ९ वी च्या वर्गात फिज़िक्स चा पेपर चालू होता. शालिनी मॅडम वर्गावर होत्या. वर्गावर त्यांची बारीक नजर होती. तिसऱ्या रांगेतल्या निलेश कडे त्यांची नजर गेली आणि त्यांना काही तरी जाणवलं. त्या उठून निलेशच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. निलेश चपापला, लिहिणं थांबवून उगाचच विचार करतो आहे असा चेहरा करून बसला. मॅडम तिथेच उभ्या होत्या आणि निलेशला काय लिहावं हे सुचत नव्हतं. थोडा वेळ तसाच गेला. निलेश नुसताच बसून होता. अजून पांच मिनिटं झाली आणि शालिनी मॅडम नी निलेशला ...Read More

2

शालिनीच काय चुकलं ? - भाग २

शालिनीचं काय चुकलं ? भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा शालिनी मॅडमनी सर्व वृत्तान्त कथन केला. अगदी जसं होतं तसा. नंतर पोलिसांनी प्रिन्सिपल आणि इतरांची चौकशी केली आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी देण्यात आली आणि सगळा स्टाफ आणि शिक्षक लोक अन्त्यसंस्कारात सामील झाले. पोलिसांनी ‘आत्महत्या’ म्हणून केस ची नोंद केली. अश्या प्रकारची घटना शाळेत प्रथमच घडत होती, त्यामुळे सर्वांवरच शोक कळा पसरली होती. अत्यंत व्यथित अंत:करणाने निलेशच्या आई, वडिलांचे सांत्वन करून सगळे आपापल्या घरी गेले. त्याच मोहल्यात एका गल्लीत वेगळंच नाटक चालू होतं. एका मोहल्ला नेत्याच्या घरी बैठक भरली होती. एक जण नेताजीला सल्ला देत ...Read More

3

शालिनीच काय चुकलं ? - भाग ३ - अंतिम भाग

शालिनीचं काय चुकलं ? भाग 3 भाग २ वरुन पुढे वाचा संचालकांनी इतक्या नी:संदिग्ध शब्दांत पाठिंबा जाहीर केल्या मुळे आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच धीर आला. त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. दोन दिवस भेटायला येणाऱ्यांची रिघ लागली होती. शालिनीबाई बऱ्याच लोकप्रिय शिक्षिका होत्या. आणि शालिनीबाईंच्या हातून असं काही कृत्य घडेल यावर कोणाचाच विश्वास बसला नव्हता. इतक्या साऱ्या लोकांचा विश्वास पाहून शालिनीबाई भारावून गेल्या. त्यामुळे गाडी पूर्वपदावर यायला मदत झाली. काळ हे उत्तम औषध असतं म्हणतात. शालिनीबाई सुद्धा शाळेच्या कामात रुळल्या. सर्व गोष्टीत पूर्वी प्रमाणेच रस घेऊ लागल्या. पोलिसांचा तपास चालूच होता. सर्व पुरावे गोळा करणं चालू होतं. संबंधित लोकांचे जाब, जबाब ...Read More