रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष टाकला. मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते. विचारचक्रांच्या जाळ्यात तो घेरला होता. विचारचक्रही अधिकच क्लिष्ठ बनत चालले होते. उलट - सुलट विचारांचा अग्नी भडकू लागला होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसची योग्य विल्हेवाट लावून त्याने चेहऱ्यावर थंडगार पाणी मारलं. तो दिसायला सहा फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, अतिशय गोरापान चेहरा, लांब वाढलेल्या दाढी मिश्या, अंगात पांढर टी -शर्ट आणि काळा पॅन्ट. त्यावर असलेली काळ्या रंगाची हुडी त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षण बनवत होती. सुटलेल्या बुटाची लेस बांधून तो रेल्वेच्या बाहेर पडला. रेल्वे स्टेशनवर लोकांची बरीच गर्दी होती. आपल्या हुडीची टोपी डोक्यावर घेऊन तो त्या गर्दीतून वायुवेगाने मार्गक्रमण करू लागला. विचाराच्या क्लिष्ठ गुंतेत तो परत अडकत चालला होता. इतक्यात एका तरुणीचा त्याला धक्का लागला.

1

Complicated Love - 1

Complicated Love ( भाग 1) रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते. विचारचक्रांच्या जाळ्यात तो घेरला होता. विचारचक्रही अधिकच क्लिष्ठ बनत चालले होते. उलट - सुलट विचारांचा अग्नी भडकू लागला होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसची योग्य विल्हेवाट लावून त्याने चेहऱ्यावर थंडगार पाणी मारलं. तो दिसायला सहा फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, अतिशय गोरापान चेहरा, लांब वाढलेल्या दाढी मिश्या, अंगात पांढर टी -शर्ट आणि काळा पॅन्ट. त्यावर असलेली काळ्या रंगाची हुडी त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षण बनवत होती. सुटलेल्या बुटाची लेस बांधून तो रेल्वेच्या बाहेर पडला. रेल्वे स्टेशनवर लोकांची ...Read More

2

Complicated Love - 2

भाग 1 वरून पुढे " सत्यमेव जयते..सत्याचाच नेहमी विजय होवो. सत्यप्रकाशाचे किरण या समग्र विश्वात पसरून सर्वत्र शांतता नांदो प्रतापरावांच्या मनाच्या सप्तद्वारात पडघमांचे कटू सत्य बोल घुमत होते. काळाच्या पाठलागावर असतांना नेहमीच त्यांचा सत्यासाठी प्रदीर्घ असा संघर्ष राहिला होता. पण आता परिस्थिती जरा वेगळी होती. प्रतापराव देसाई हे रिटायर्ड IPS अधिकारी होते. अतिशय धिप्पाड , उंचपुरे ,दिसायला साधारणतः गहूवर्णीय रंग ,लांबसडक नाक ,वाढलेल्या दाढीमिश्या कुणाचंही लक्ष्य वेधून घेईल असं मजबूत व्यक्तिमत्व .आपल्या नौकरीच्या किंवा जनसेवेच्या कारकिर्दीत प्रतापराव देसाई हे नाव ऐकतांच कितीतरी गुन्हेगाराच्या काळजात धडकी भरत असे. याला कारण म्हणजे कुठेही तडजोड नाही. वारा वाहायला कधीच कुणाच्या परवानगीची ...Read More

3

Complicated Love - 3

भाग 2 वरून पुढे" मॅडम आपला स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफी " वेटरच्या आवाजाने अदिती भानावर आली.खरंतर मनात मयूरपिसारा फुलला होता. आपल्या केसांशी चाळे करत अजूनही ती त्याला चोरनजरेने न्हाहाळतच होती पण साधी नजरा नजरही न व्हावी केवढं हे दुर्दैव. पोटात असंख्य फुलपाखरांनी अगदी थव्याने उडून मनला खट्याळ गुदगुल्या कराव्या असेच काहीसे तिला भासत होते.मनाच्या लडिवाळ द्वंदात तिने पिझ्झा आणी हॉट कॉफी कधी संपवली हे तिला देखील कळले नाही." मॅडम आपले बिल " वेटरने परत एकदा तिच्या मनातल्या पहिल्या प्रेमद्वंदाला भंग केले होते. पैसे देण्यासाठी अदिती आपली पर्स चाचपडू लागली होती पण दुर्दवाने ती पर्स तिच्या रूमवरच विसरली ...Read More

4

Complicated Love - 4

भाग 3 वरून पुढेदिवसेंमागून दिवस जात होते. त्या तरुणाला भेटून अदितीला जवळपास एक सप्ताह झाला होता. त्याच्या भेटीसाठी अदितीचे सैरभैर होत होते ." इंद्रधनुष्या तूझ्या या सप्तरंगासारखा त्यालाही घेऊन ये माझ्या खिडकीजवळ" आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याला बघून अदिती म्हणाली." काय मॅडम कुणाशी बोलताय...कि एकट्याच बडबड करायला लागल्याय आता " खोडी काढत मेघा म्हणाली." नाही ग सहजच " अदितीने लाजून तोंड लपवले . सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता.साधारणतः सायंकाळचे 6 वाजले असेल . सर्व परिसर तांबूस किरणात न्हाहून निघाला होता. जणू अस्ताला जाणारा सूर्य सर्वत्र पिवळे सोने पसरवीत आहे असेच भासत होते. अदिती खिडकीत कॉफीचा कप घेऊन ...Read More

5

Complicated Love - 5

भाग 4 वरून पुढे" आता कसं वाटतय तुला ?" डॉक्टरांच्या प्रेमळ शब्दांनी भूतकाळात हरवलेली अदिती वास्तविक जगात परतली.केळीच्या गाभ्यासारखे नाजूक हात वेदनेने जखडले होते. चेहऱ्यावरील तेजस्वी कांती कुठेतरी विरून गेली होती. लहानशी हालचाल करण्यातही तिला बराच त्रास जाणवत होता. लांबसडक अगदी झुपक्या झुपक्याने बहरणाऱ्या देवदार वृक्षाप्रमाणे तिच्या मनात भूतकाळातल्या आठवणी बहरल्या होत्या." हो आता ठीक आहे मी" शब्दांची जुळवाजुळव करीत अदिती म्हणाली." तुझ्या घरच्यांना आम्ही तुझ्याबद्दल कळवलंय काही वेळातच तुझे आई बाबा येईल इथे. तुझी प्रकृतीही आता काहीशी स्थिरावलीय तुला आता जनरल खोलीत हलवायला काही हरकत नाही". धीर देत डॉक्टर म्हणाले. अदितीनेही फक्त होकारार्थी मान डोलावली. अदितीला ICU मधून ...Read More

6

Complicated Love - 6

भाग 5 वरून पुढेखोलीत कुणाच्यातरी धारदार शस्त्र असलेल्या सावल्या अधिकच गडद होत चालल्या होत्या. शरीरात उसडलेल्या वेदनेमुळे अदितीला एका साधं हलताही येत नव्हतं. तरीसुद्धा ती त्या सावल्यांचा कानोसा घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करीत होती. मनात एका अनामिक भीतीची हुरहूर लागली होती. एवढ्यात कुणाच्यातरी सॅण्डलचा आवाज तिच्या कानावर आदळू लागलातश्या त्या सावल्याही कुठेतरी अदृश्य झाल्या. अदितीच्या आईने तिच्या खोलीत प्रवेश केला. अदितीची अशी अवस्था पाहून आईच्या नेत्रात दुःखरूपी साचलेले मळभ गालावरून ओघळू लागले होते. अदितीच्या कपाळावरून मायेचा हात फिरवत नक्की काय घडले याची ती प्रेमळपणे विचारणा करीत होती. अदितीने सर्व घटना विस्तारित करून एकापाठोपाठ सांगितल्या. आपल्या एकुलत्या एका मुलीची अशी अवस्था ...Read More

7

Complicated Love - 7

भाग 6 वरून पुढेअदितीने गाडीचा वेग वाढवत ईशांतच्या गाडीचा पाठलाग करायला सुरवात केली. ईशांत भरघाव वेगाने जीवाची कसलीही पर्वा करता त्या तरुणाचा पाठलाग करीत होता. नागमोळी वळणे, लोकांचा गर्दीप्रवाह याला तुफान वेगाने मागे टाकत ईशांत त्या तरुणाला पकडण्याचा अतोनात प्रयत्न करीत होता. त्याची भुवया आकसून तीक्ष्ण झालेली नजर क्रोधाच्या आगठिणग्या बरसवीत होती. अदितीच्या स्कुटीनेही जोर धरला होता. वाऱ्याच्या झोतामुळे तिचे रेशमी केस अस्तव्यस्त होऊन तोंडावर जमा झाले होते. स्कुटीच्या हॅण्डलला पकडलेल्या तिच्या गोऱ्यापान हातावर सकाळचे बारीकसे दवाचे थेंब साचले होते. आपली नजर रोखून ती ईशांतच्या मागावर होती. त्या तरुणाची दुचाकी एका पडक्या कारखान्याजवळ थांबली. मागून येणाऱ्या अर्जुनला पाहताच त्या ...Read More