वडाखाली सापडलेली बाहुली पावसाळा नुकताच संपला होता. मातीतअजून ओली होती आणि रस्त्याच्या कडेला असलेले हिरव गवत वाऱ्याबरोबर हळूहळू हलत होतं. दिवसा गाव शांत आणि इतर गावासारखं दिसायचं, पण दिवस मावळला की गाव अंधारात बुडून आणि गावात एक अनामिक भीती पसरायची. घराबाहेर लावलेले दिवे रात्री बंद व्हायचे जणू दिव्याचा उजेडाने कोणीतरी घर शोधीत येईल . कुत्री एकाच दिशेला पाहून बेसूर ओरडायची. गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ कसलीतरी कुजबुज ऐकू यायची,आणि वर झाडावर बसून घुबड रात्रभर ओरडायची ,जणू झाडाखाली कोणी बोलत बसले आहे
काळी बाहुली - भाग 1
काळी बाहुलीभाग १ वडाखाली सापडलेली बाहुलीपावसाळा नुकताच संपला होता. मातीतअजून ओली होती आणि रस्त्याच्या कडेला असलेले हिरव गवत वाऱ्याबरोबर हलत होतं. दिवसा गाव शांत आणि इतर गावासारखं दिसायचं, पण दिवस मावळला की गाव अंधारात बुडून आणि गावात एक अनामिक भीती पसरायची. घराबाहेर लावलेले दिवे रात्री बंद व्हायचे जणू दिव्याचा उजेडाने कोणीतरी घर शोधीत येईल . कुत्री एकाच दिशेला पाहून बेसूर ओरडायची. गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ कसलीतरी कुजबुज ऐकू यायची,आणि वर झाडावर बसून घुबड रात्रभर ओरडायची ,जणू झाडाखाली कोणी बोलत बसले आहेत्या वडाच्या झाडाबद्दल गावात जास्त कोणी बोलत नसे किंवा विचारले तरी कोणी त्या झाडाबद्दल माहिती सांगत ...Read More
काळी बाहुली - भाग 2
भाग २ दाराबाहेरचे ठसेनिखिल काही क्षण पलंगावर बसून त्या बाहुलीकडे पाहत राहिला. खोलीत इतकी शांतता होती की त्याला स्वतःच्या ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. बाहुली पलंगाच्या एका कोपऱ्यात बसली होती. तिचं काळं डोकं किंचित खाली झुकलेलं होतं. चेहऱ्यावर डोळे नव्हते, तरी निखिलला ती आपल्याकडेच पाहत असल्याची जाणीव होत होती.त्याने हळूच मोबाईल हातात घेतला आणि टॉर्च तिच्या चेहऱ्यावर टाकली. प्रकाश पडताच बाहुलीच्या डोळ्यांच्या जागी असलेले दोन काळे खड्डे अधिक खोल दिसू लागले. त्या काळोखात काहीतरी हलल्यासारखं त्याला जाणवलं. निखिलने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिलं. आता तिथे काहीच नव्हतं.त्याने स्वतःला समजावलं की भीतीमुळे त्याला भास होत आहेत. पण त्याच वेळी बाहुलीच्या ...Read More
काळी बाहुली - भाग 3
काळी बाहुलीभाग ३ बंद खोलीतला आवाजदरवाजावर झालेल्या त्या तीन टकटकांनी संपूर्ण घर हादरल्यासारखं झालं. निखिलच्या कानात अजूनही त्या आवाजाचा घुमत होता. बाहेर कोणी आहे याची त्याला खात्री होती, पण त्या व्यक्तीला आत येऊ द्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आजी त्याच्या शेजारी उभी होती. तिच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की निखिलच्या मनगटाला दुखायला लागलं होतं.बाहेर पुन्हा शांतता झाली.काही सेकंद गेले.मग दरवाजाच्या पलीकडून हळू आवाज आला.आजी, मला आत येऊ दे.आजीच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. तिचे डोळे दरवाजावर खिळले. निखिलने पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतकी खोल भीती पाहिली होती.तो हळू आवाजात म्हणाला, आजी, कोण आहे ती.आजीने उत्तर दिलं नाही.बाहेरून पुन्हा आवाज आला.आजी, ...Read More