निकालाची परिक्षा

(3)
  • 8.1k
  • 0
  • 3.1k

निकालाची परीक्षा – १ वेळ दुपारचे तीन. स्थळ कुलकरण्यांचा फ्लॅट.सदाशिव कुलकर्णी धापा टाकत घरी पोचले होते. "आला का तो? काही कळले का?" सदाने उपस्थित सर्वांकडे एकदा आशेने नजर फिरवली आणि सर्वांची शांतताच त्याला योग्य ते उत्तर देऊन गेली. हताशपणे त्याने त्याचे सामान बाजूला ठेवले आणि सोफ्यावर बसलेल्या गंगाधर कुलकर्णी अर्थात सदाचे वडील यांच्या शेजारी जाऊन बसला. वडिलांचा हात पाठीवर फिरताच तो स्वतःच्या भावना आवरू शकला नाही. "सदा, अरे असा रडतोस काय? येईल तो इतक्यात." - सदाचे वडील प्रसंगच तसा बाका होता. सदाशिव कुलकर्णी यांचे जेष्ठ सुपुत्र म्हणजेच निनाद कुलकर्णी शाळेतून अजून परत घरी आले नव्हते. शाळा आणि घर यातील जेमतेम दहा मिनिटांचे

Full Novel

1

निकालाची परिक्षा - 1

निकालाची परीक्षा – १ वेळ दुपारचे तीन. स्थळ कुलकरण्यांचा फ्लॅट.सदाशिव कुलकर्णी धापा टाकत घरी पोचले होते. का तो? काही कळले का?" सदाने उपस्थित सर्वांकडे एकदा आशेने नजर फिरवली आणि सर्वांची शांतताच त्याला योग्य ते उत्तर देऊन गेली. हताशपणे त्याने त्याचे सामान बाजूला ठेवले आणि सोफ्यावर बसलेल्या गंगाधर कुलकर्णी अर्थात सदाचे वडील यांच्या शेजारी जाऊन बसला. वडिलांचा हात पाठीवर फिरताच तो स्वतःच्या भावना आवरू शकला नाही. "सदा, अरे असा रडतोस काय? येईल तो इतक्यात." - सदाचे वडील प्रसंगच तसा बाका होता. सदाशिव कुलकर्णी यांचे जेष्ठ सुपुत्र म्हणजेच निनाद कुलकर्णी शाळेतून अजून परत घरी आले नव्हते. शाळा आणि घर यातील जेमतेम दहा मिनिटांचे ...Read More

2

निकालाची परिक्षा - २

निकालाची परीक्षा – २ नाही नाही, असे काही शक्य नाही. येईल तो इतक्यात. - कुमुद मुलाला कोणी पळवले आहे किंवा तो घर सोडून गेला आहे या दोन्ही कल्पना कुलकर्णी कुटुंबाच्या कल्पनेपालिकडच्या होत्या, त्यामुळे साहजिकच कुमुद अशी कुठलीही शक्यतासुद्धा नाकारत होती. अहो मॅडम काळ बदलला आहे आता. अशा खूप केस बघितल्या आहेत मी. - पिंकीचे वडील. 'काळ बदलला आहे' हे स्वतःचे वाक्य स्वतःच अशा प्रकारे ऐकून सदा मात्र निरुत्तर झाला होता. परन्तु पिंकीच्या वडिलांना दुजोरा देण्याची जणू स्पर्धाच सुरु होती, प्रत्येकजण आपल्या ओळखीतल्या जणांचे असे प्रसंग वर्णन करू लागला होता. अहो परवाच आमच्या हास्य क्लब मधल्या एका गृहस्थाच्या नातवाने ...Read More