सीमा (कथा )

(28)
  • 3.6k
  • 1
  • 1.1k

कथा - सीमा ---------------------------------- अनिता आफिस जाण्याच्या तयारीतच होती ,आणि मोबाईल-रिंग वाजली , इतक्या घाईच्या वेळी तिला बोलणे जमणारे नव्हते ,केवळ नाईलाज म्हणून तिने .उत्तर दिले.. हाय सीमा - बोल ..! पलीकडून सीमा म्हणाली .. लंच टाईम मध्ये वेळ काढून बोलावेस अनिता ..तुझे मत आणि सल्ला हवा आहे मला .मी कॉल करेन तुला बाय. सीमाने घाईच्या वेळी कॉल करून ..अनिताच्या डोक्यात विचारांचा भुंगा सोडून दिला होता , आफिस्ला जाईपर्यंत आता एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता ..सीमाचे ठरलेले लग्न ..? त्याबाबत तर नाही ना काही ? देवा ..असे काहीच नसू दे.. अनिता मनोमन प्रार्थना करीत होती..सीमा तिची बेस्ट फ्रेंड ..अगदी धाकट्या बहिणी सारखी , एकमेकींना शेअर केल्याशिवाय राहवत नसे , त्यातून हा