फोबिया - (कथा )

(11)
  • 3.5k
  • 4
  • 952

फोबिया - (कथा ) -अरुण वि.देशपांडे -पुणे. ---------------------------- माणसाच्या स्वभावातील खाचाखोचा कळणे ", म्हणजे एखादा माणूस आपल्याला समजू लागलाय असे वाटणे. पण, ही समजूत अतिशय फसवी ठरू शकते. हातातील पुस्तकच्या पानातील मजकूर वाचून संगीताला वाटले - " खरेच आहे की हे...! . पती-पत्नीच्या सहजीवनाला सुरुवात होते त्या दिवसापासून त्यांच्यात परस्परांना समजावून घेण्याची -सामावून घेण्याची भावनिक -प्रक्रिया सुरु झालेली असते . " स्वतःला समजून घेतले पाहिजे", ही अपेक्षा नाण्याची एक बाजू आहे "असे गृहीत धरले तर दुसरी बाजू म्हणजे " इतरांना समजून घेतले पाहिजे " असे आहे का नाही ? हाच प्रश्न आत्ता संगीताने स्वतःला विचारून पाहिला.तेव्न्हा या प्रश्नाचे उत्तर तटस्थपणे देता