अमोल गोष्टी - 6

  • 8.1k
  • 1
  • 3.4k

(डॉ. जाकीर हुसेन हे सुप्रसिध्द शिक्षणशास्त्रज्ञ होते. वर्धा शिक्षण पध्दतीचे ते प्रमुख होते. हिंदीच्या परिचय-परीक्षेसाठी त्यांनी लिहिलेली 'अब्बूखाँकी बकरी' ही सुंदर गोष्ट आहे. ती मनोहर व भावपूर्ण गोष्ट माझ्या सर्व वाचकांस कळावी म्हणून देत आहे.) हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.