अमोल गोष्टी - 9

  • 8.5k
  • 3
  • 3.5k

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार? गार वारा वाहत होता. जवळच्या शेतातून कोल्हे ओरडत होते. मुले मातांना घट्ट बिलगत होती. लहानगा धीट रमेश मात्र ड्रायव्हरला म्हणाला, 'पों पों वाजय म्हणजे कोल्हे भिऊन पळून जातील.'