अलवणी - ६

(57)
  • 29.3k
  • 7
  • 15.4k

रामुकाका सावकाश पावलं टाकत दोघांच्या जवळ येऊन उभे राहीले. त्यांच्या खांद्याला एक पिशवी होती तर दुसर्‍या हातात एक चुळबुळ करणारा मांजराचं छोटंस पिल्लु. “रामुकाका? अहो होतात कुठे तुम्ही? असे अचानक कुठे निघुन गेलात? काही सांगुन जायची पध्दत…”, आकाशने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. “सांगतो.. सांगतो.. जरा मला आतमध्ये तरी येऊ द्यात…”, रामुकाका पायर्‍या चढुन व्हरांड्यात येत म्हणाले… “अहो काय सांगतो?? इथे काय परिस्थीती ओढावली आहे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही कुठल्या संकटातुन जात आहोत…”, आकाश “काय झालं?”, रामुकाकांनी विचारले.. मग आकाशने रामुकाका गेल्यानंतर थोडक्यात घडलेल्या घटना त्यांना ऐकवल्या. थोडावेळ जाउ देऊन रामुकाका म्हणाले…”मी सांगीतलं होतं तुम्हाला.. तुमचाच विश्वास बसला नाही माझ्यावर…”