अमोल गोष्टी - 12

  • 7.3k
  • 2
  • 3.3k

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आता आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळयाच्या डाव्या हातात एक तराजू होता व उजव्या हातात तलवार होती. या शहरात कोणत्याही गोष्टीचा निकाल नीट तोलून पाहून देण्यात येतो. त्यात रेसभरही चूकभूल होत नाही हे दर्शविण्यासाठी तो तराजू होता आणि अन्यायाचे निर्दालन करण्यात येते हे दाखविण्यासाठी ती तलवार होती.