मेघमल्हार आणि मारूबिहाग

  • 3.4k
  • 1.2k

शीर्षक-मेघमल्हार आणि मारूबिहाग...पहाटेची वेळ होती. मंदिराच्या गाभार्‍यात भाट भूपाळी गात होता. अहिर भैरवचे सूर उगवतीला काहीसे करूण तर काहीसे प्रसन्न करीत होते.राजवाड्यातल्या समया केव्हाच विझू विझू झाल्या होत्या.रात्रभरीच्या सुखाने ती उमलली होती. शीतल चांदण्यांच्या मंदशा आल्हादाने न्हाहून गेली होती. तो परवाच आला होता शेजारच्या राज्याच्या सीमेवर युद्ध जिंकून. त्याच्या स्फुरण पावणार्‍या बाहूंनी शत्रूला नेस्तनाबूत केलं होतं. त्याच्या धमन्यात सळसळणार्‍या रक्तानेच त्याला प्रेरणा दिली होती जिंकण्याची. आपल्या राज्याच्या सुखासाठी झटणारा तो उमदा राजा आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी,त्याने स्वयंवरात पण जिंकून आणलेली त्याची राजकन्या नवपत्नी.नव्या नवलाईच्या आणि तृप्त प्रजेच्या आकंठ सुखात ते दंग होते. तिच्या मोहनवीणा वादनाचे अलवार सूर त्याच्या कानी