पुष्पदरीतील झुंज.., आयुष्याशी

  • 3.8k
  • 1.2k

यावर्षी व्हॅलीला जायचं तिचं नक्की झालं होतं.आईला चारधाम करण्याची इच्छा होती.पण एकदम सगळं जमणं कठीण वाटत होतं.त्यामुळे आईचं बद्रिनाथ होईल आणि आपला व्हॅलीला जाऊन ट्रेक आणि फुलांचा अभ्यास दोन्ही होईल अशा विचाराने तिने मावशीला आणि काॅलेजमधली घट्ट मैत्रीण अनुयालाही बरोबर न्यायची तयारी केली. चौघीच जाणार म्हणून बाबा काळजीत होते पण तिचा मित्र  राकेश त्याचदरम्यान त्याच्या ट्रेकिंग क्लबबरोबर आसपासच्या परिसरात फिरणार होता.त्यामुळे सगळंच जुळून आलं. पहिला प्रवास सुखरूप पार पडला आणि मंडळी मजल दरमजल करीत घांगरियाला पोहोचली. आई आणि मावशी गोविंदघाटहून घांगरियाला घोड्यावरून येऊन हाॅटेलात दाखल झाल्या आणि ती म्हणजे स्वप्नजा आणि अनुया राकेशच्या समूहाबरोबर दिवसभराची खडी चढण चढून पोहोचल्या. दमून