ओळख.

  • 10.3k
  • 2.2k

ओळख कैलास. ज्याच्या नशिबी दारिद्र आणि हालअपेष्ठा म्हणजे जणू पाचवीलाच पुंजलेली . जन्मला तेव्हा जन्मदातीने डोळे मिटले. आणि बायको गेली म्हणून बाप दारूच्या आहारी. त्याच नशेत घरातलं असलं नसलं दररोज वेशीवर निघायच. त्यामुळे घरची परिस्थिती अजूनच बिकट होत होती. आईविना असलेला पोर म्हणून ६ वर्ष्यापर्यंत मावशींनी वागवलं, पुढे तिची स्वतःची कुस फुलली आणि कैलास बापाकडे राहायला आला,त्याच घर म्हणजे १ खोली. त्याच्या एक कोपऱ्यात चूल होती,दुसऱ्या कोपऱ्यात एक पलंग, त्यावरच्या वाकळ अगदी मूळचा रंग सोडून सगळ्या एकरंगी काळपट झाल्या होत्या, घरात कोळींच्या जाळ्यांनी आणि उंदीरांनी हौदोस मांडला होता.बाकी इतर वस्तू म्हणजे नावालाच. अगदी रोजच्या वापरायला हि नुपूर यायची. खरं तर