महाशिवरात्र

  • 2.2k
  • 757

आजचा दिवस वेगळाच होता. आनंदराव धर्माधिकारी आज बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या मिटींगसाठी निघाले होते. त्याचवेळी सुमनचीही लगबग सुरु झाली.घरातल्या कामवाल्या बाईला सूचना देऊन सुमन आवरून निघाली. सासूबाईंना माहिती होतं की तिच्या मैत्रिणींबरोबर ती आज एका दिवसाच्या सहलीला चालली होती.उद्या येते सासूबाई संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. हे ही घरात नाहीत आणि अर्णवही गेला आहे ट्रेकला.सांभाळून रहा.नम्रता.. आपल्या गंगाबाईंची मुलगी येईल संध्याकाळी तुम्हाला सोबत.सकाळी जाईल उठून लवकर.काही हवं नको ते तिलाच सांगा.अगं हो सूनबाई,नको इतकी काळजी करूस.ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच होता दारात.आनंदरावांनी आज त्याला सांगितलं की तू आज जा घरी परत.आज अनेक दिवसांनी स्वतः गाडी चालवण्याची इच्छा आहे माझी. आनंदराव स्वतः चालकाच्या खुर्चीत बसले