चित्रकार

  • 6.1k
  • 1
  • 1.2k

चित्रकार त्या बागेत भरलेल्या गर्दीवर अमर ने आपली नजर फिरवली .सोबत असलेला पत्रकार त्याला म्हणाला ,”पाहिलेत साहेब कीती गर्दी उसळली आहे या तुमच्या पेंटिंग च्या प्रदर्शनाला ..आणि हो तुमची चित्रे तर एकसे एक आहेत हे मात्र निर्विवाद ..”अमर हसला आणि म्हणाला ,” हो ते तर दिसतेच आहे म्हणा ..मलाही खुप आनंद वाटतो आहे ,माझ्या कलेला मिळालेली “दाद “पाहुन ..”अमर एक अतिशय उत्तम चित्रकार होता .पेंटिंग ची आवड त्याच्या घरातुन आली होती .त्याचे वडील ,आजोबा अतिशय चांगले चित्रकार होते ,पण आर्थिक चणचणी मुळे त्या काळी ते फार पुढे येऊ शकले नव्हते .अमर च्या बाबतीत मात्र घरातुन त्याला पुर्ण प्रोत्साहन पहिल्या पासुन