शॉक !

  • 6k
  • 1
  • 2.2k

साला वैताग आहे! आज पुन्हा निर्मलेने कडकड केली! आमच्या लग्नाला आता या चोवीस मेला,पाच वर्ष होतील. अजूनहि तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही. तशी ती भांडकुदळ नाही, पण भडक माथ्याची मात्र आहे. कधी कधी फारच लावून धरते, लहान मुलांसारखं! हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत, इतकंच काय ती विनाकारण पण भडकते! पण मला त्याचे खरे कारण माहित आहे!माझी आई! आई माझ्या सोबत रहाते, ते तिला नको आहे! आता मला सांगा , या उतार वयात तिने कोठे जावे आणि का? डोळे, कान आदू झालेत, चकरा येतात, बी. पी., डायबिटीज सारखे जन्माचे सोबती आहेत! येथे शहरात डॉक्टर, दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत.