सावज !

  • 10.6k
  • 4.5k

'सन सेट' पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर लांब होता. संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात. रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता. मध्ये खूप झाडी होती, पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे. पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय. ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती. लाईट गुल झाले होते!. आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले. ' तासा दीड तासांचा तर प्रश्न होता. साडे सहाला जरी