पेटलाच कि !

  • 3.9k
  • 1.4k

मी भग्या, आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत. रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं, हेच आपलं काम. शाळा आसन, तर बी हेच काम असत आपलं! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो. खाऊन खिसाभर संग घेतल्यात. मी खाकी चड्डी वर करून दोन पायावर उकिडवा बसलो अन कडब्याच्या गंजी खाली वाकून बघितलं, तर काय? बा बिड्या वडताना जसा भकाभका धूर काढितो, तसा धूर खालुन निघत होता! गन्जीच्या टोकाला पायलतर, भली थोरली धुराची वावटळ आभाळात घुसली व्हती! मायला, गंजी पेटली का काय? म्या पुन्नानदा गंजीच्या टोकाकडे बगतील तर, गप्पकन जाळच निगाला! पेटलंच कि! दोनी हातानं ढगाळी चड्डी कमर