कोण होती ती ?

  • 5.1k
  • 1
  • 1.7k

तसा 'तिचा' आणि माझा सहवास उणे -पुरे पंचेवीस -तीस वर्षांचा. आमच्या सहवासातून आणि तिच्या सांगण्यातून 'ती ' थोडी फार समजली. जगण्याची चिकाटी आणि दुःख यांचं मिश्रण होती. तिला तीन भाऊ आणि एक मोठी बहीण होती. पण इतरांन पेक्षा तिचा लहानग्या 'भगवानावर' भयंकर जीव. चिंचेच्या बोटकातले, अर्धे बोटूक भगवाना साठी ठेवायची. देवळातला खडीसाखरेचा खडा असो कि पाडाचा आंबा असो. त्यात भगवानाचा हिस्सा असायचा. घरची गरिबी. भांडी, धुणं, नदी -विहिरीचं पाणी, सडा सारवण, सार तिच्या आईच्या बरोबरीनं करायची. थोरली बहीण सक्काळी दूध -काला खाल्ला कि गजगे घेऊन खेळायला पळायची. शेतात जाता -येत, म्हशी मागे फिरताना पायात काटे मोडायचे, म्हणून कोणीतरी एक