सायको!

  • 8.3k
  • 2.4k

जेव्हा जेव्हा संध्याकाळी सवड मिळेल तेव्हा मी येथे येवून बसतो. आमच्या गावा पासून साधारण दीड -दोन किलोमीटर वर हे एक रेल्वे स्टेशन आहे. पूर्व -पश्चिम पसरलेला 'फलाट', संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात नाहुन निघतो, दृष्य रोजचेच असले तरी, ते रोजच मला विलोभनीय वाटते. काय म्हणता वर्दळ? अहो, खेड्याचे 'ठेसन' आहे. कसली आलीय वर्दळ? औषधा सारखी सकाळ -दुपार -संध्याकाळ, एक एक रेल्वे शिट्टी मारून जाते. त्या सुमारास चार दोन रेल्वे कर्मचारी, एक स्टेशनमास्तर, एखाद-दुसरं प्यासिंजर इतकंच. बाकी इतर वेळेला निवांत कारभार! सायडिंगची एखादी मालगाडी, चार गांजलेल्या व्यागिनी, दूरवर स्लिपरच्या वर्षानुवर्ष पडलेली फळकुट, दगडाच्या गिट्टया (मेटल ) ,बाजूलाच दगडी चिरे ,काही न घडवलेले मोठाले दगड. हे