काली !

  • 3.9k
  • 1.8k

"बापरे, चष्मा फुटलाच कि!" आता त्याच्यावर,चुकून का होईना, बसल्यावर काय होईल?मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय, म्हणजे लावायला लागला. याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते. असेन दहा बारावर्षाचा,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन, नेहमीचीच. तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती. त्या दिवशी काय झाले माहित नाही, बॉल बुलेटच्या वेगाने माझ्या डोक्यावर आदळला. खाली पडलो. हॉस्पिटल. दोन दिवस कोमात होतो म्हणे. दोन दिवसांनी डोळे उघडले, तर अंधुक दिसू लागले. खूप तपासण्यांती पाऊण इंच जाडीच्या भिंगाचा, चष्मा डोळ्याला लागला! वर 'नेहमी वापरा. काढू नका. नजर खूप कमजोर झालीय आणि ती सुधारण्याचा शक्यता शून्य आहे! तेव्हा काळजी घ्या!'हा सल्ला हिडॉक्टरांनी दिला. तेव्हा पासून म्हणजे, बारा