शिव-सिंहासन-भाग ४

  • 6k
  • 2.4k

दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिंद,अमित,प्रसाद आणि भिवाजी...हत्ती तलावात उतरले...फक्त गुडघाभर पाणी होते...चुन्याची फुटलेली घोंणी पाण्यातच तरंगत होती...पण पाणी मात्र पांढरे दिसत नव्हते..पण पाऊसात काहीच समजत नव्हते..थोड्या वेळाने पाऊस थांबला...आणि तेव्हा अमितचे लक्ष तलावाच्या तळाशी असलेल्या..फरशीकडे गेले काल चुन्याची घोंणी पडली...तेव्हा तलावात पाणी नव्हते आणि त्या घोणीच्या वजनाने ती फरशी तुटली गेली होती..आणि म्हणून इथे पाणी जमा होत नाही आहे ...मिलिंद बोलून गेला.... इथे फरशी ?? तलावाच्या तळाशी फरशी?? तलाव बांधताना कोण फरशी लावेल ??.. काहीतरी नक्कीच आहे इथे...फरशी काढण्याच्या त्यांनी प्रयत्न केला... पण गाळ असल्यामुळे फरशी काही निघाली नाही... मग चौघांनीही तिथे असलेला गाळ उपसायला सुरुवात केली. १