युद्ध चित्रपट (युध्दस्य कथा रम्य:)

  • 10.2k
  • 1.9k

फार पूर्वी एक चित्रपट अनावधानाने बघण्यात आला होता...जर्मन होता का फ्रेंच नक्की माहित नाही आणि खाली सब-टाइटल्स पण नव्हते.. चित्रपटाला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती..कथा अशी होती एक त्रिकोणी कुटुंब जर्मनीतल्या सुदंर खेड्यात रहातं असते आई वडील आणि त्यांचा एक गोड मुलगा ५ ते ७ वर्षाचा ...दुसऱ्या महायुद्धाची झळ अजुन तरी त्या गावाला लागलेली नव्हती...घरात अठरा-विश्व दारिद्र्य..हाता तोंडाची गाठ पडायची मुश्किल..मग लहान मुलासाठी खेळणी कुठून आणणार..पण आई वडील दोघेही दुःख कधीच कवटाळून बसणारे नव्हते...आपल्या मुलाला नेहमी खुश ठेवायला धडपडत होते...खेळणी नाही मग वडील मुलासाठी काल्पनिक खेळ रचायचे त्या मुलासाठी ते समजण्याचे वयच नव्हते