शाम्या - द बेकुफ!

  • 4.7k
  • 1
  • 987

" सुरश्या, उद्या तुझ्या कडे नगरला येतोय." एक दिवशी अचानक फोन आला. " हॅलो, पण कोण बोलतंय?" असं बेधडक बोलणारा माझ्या माहितीत कोणी नाही. " शरम नाही वाटत असं विचारायला? अजून तसाच आहेस डॅम्बीस! "शंकाच नाही, बेकूफ शाम्याचं असणार! " कोण, शाम्या तू? किती दिवसांनी भेटतोयस? पण तू कुठे आहेस? कसा येणार आहेस? बसने, रेल्वेने कि ..... "माझी गाडी घेऊन येतोय. बाकी सगळं भेटल्यावर, पैले तुझा पत्ता सांग."" प्रेमदान चौकात ये, तेथे सिग्नला थांब, अन मला रिंग दे, मी येतो न्यायला.""बाय!" त्यानं फोन कट केला. प्री -डिग्रीला शाम्या माझ्या सोबत होता. बी. एस. सी. पर्यंत कॉलेजात हुंदडून एम.एस.सी साठी, औरंगाबादला गेला. त्यानंतर म्हणजे, बारा- पंधरा वर्षा नंतर भेटत आहे.