मेरे अंगने मे --

  • 3.6k
  • 1
  • 1.1k

माझ्या लहानपणी घरापेक्षा अंगण मोठे असायचे. शिवाय घरा मागे पण मोकळी जागा असायची. तेथे गुरांचा गोठा आणि त्यात एखादी दुभती म्हैस किंवा गाय असायची. बैल बारदाना शेतात. अंगणात तुळशी वृंदावन, त्याचा समोर एकाच दगडात कोरलेले नंदी आणि शिवलिंग असे. अंगणात सकाळी सडा हे नित्यकर्माचा भाग असे. संध्याकाळी कधीतरी नुसते पाणी शिंपडले जाई. तुळशी वृन्दावना समोर रोज तिन्हीसांजेला सांज वात, त्याचा समोर हात जोडून नऊवार साडीतली माझी आई, निरांजनाच्या तांबूस प्रकाशात तिचा उजळलेला चेहरा, हे चित्र माझ्या मनावर कायमचे कोरलेले आहे. आम्हा लहानग्यांचा वावर घरा पेक्षा अंगणातच ज्यास्त. घर कश्याला? तर जेवायला आणि झोपायला! पूर्वी आंगण मुक्त होती. माणसं सोडाच