राम कहाणी!

  • 7.5k
  • 3.4k

मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर, रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला. हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली. उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत, सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली. चार पावलावर अपेक्षे प्रमाणे, घराच्या पायऱ्या लागल्या. एक, दोन, तीन, तो पायऱ्या चढून गेला. हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला. हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली. अन मग कडी वाजवली. "शांते, दार खोल ग, मी आलुया!"शांती रामाची बायको. रंगाने कोळश्याची अंतरसाल! काळी ढुस्स! पण नाकी, डोळी नीटस. काळ्या रंगामुळे, चमकदार डोळे पहाणाऱ्याचा काळजाचा ठाव घ्यायचे! आवाज कमालीचा गोड. वागायला नम्र. बाप दारुड्या, घरची गरिबी, सावत्र माय,