जाब

  • 4.2k
  • 923

“ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू” तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता. तो चिडला, वैतागला. त्याने जाब विचारायचे ठरविले. तो पळत निघाला. तो पळत होता. कितीतरी दिवस नुसता पळत होता. तो पळत पळत शेकडो मैल दूर आला. रोम खूप मागे राहीले होते. तो इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड या गावी