बारक्या!--मंचकमहात्म्य

  • 7.5k
  • 1.1k

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या, दोन शिळ्या भाकरी, बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा 'अल्प ' नाश्त्याचा मुडदा पाडून, मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत, चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते. अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते. मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत. अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते."आक्का, मी आलोय ग SSS !" अंगणातून कोणी तरी टाहो फोडला. मंचकरावची धुंदी खाड्कन उतरली. पण स्वभावा प्रमाणे मुळीच घाई न करता त्यांनी सावकाश डोळे किल किले करून अंगणात नजर फेकली. सुकलेल्या चिपाडा सारखा