पलीकडलं जगणं

  • 4.1k
  • 1
  • 1.6k

झोपडपटटीच्या त्या शेवटच्या कोप-यातल्या गल्लीतील चाळीत माझ्या घराला लागून सातवी खोली… सुमार आणि मोडकळीस आलेलं ते घर, सताड उघडा दरवाजा, एक झाप बंद असलेल्या खिडकीपाशी एकटक समोरच्या रहदारीच्या रस्त्याकडे त्या अशाच आशाळभूत नजरेने एकटयाच वाट पाहत बसायच्या. मी हल्लीच त्यानां पलीकडून बघायला लागलो होतो. पूर्वी वेळ नसायचा आता मी निवांत होतो. वयाच्या सत्तरी उलटलेल्या सुरकतलेल्या चेह-यावरचे निस्तेज भाव, वाढलेल्या साधेंदुखीमुळे नीटसं चालता न येणं….खोकला होताच दिमतीला…. सार काहीं आता मरणाच्यां दाराशी नेण्यास भर घालणार… आणि त्यात आजूबाजूचं भकास एकलंकोडं वातावरण….अजूनच मन खायला उठायचं आजीचं… मायेची म्हणावी अशी माणसं, नातेवाईक कोणी नव्हतं या म्हातारपणात विचारपूस करायला…सांभाळ करायला… आपल्या तब्येतीच्या पाऊलखुणा जपत जीव जगवणं तेवढं