रखमा... (जागतिक महिला दिनानिमित्त)

  • 7.4k
  • 1
  • 1.7k

' साथीच्या रोगान विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती. नवरा अकाली गेल्याचे दुःख होतेच, तरीही आपल्या दोन लेकरांकडे बघून त्या मारुतीरायाला साकड घालत,