तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १४

(23)
  • 11.9k
  • 2
  • 5.8k

आपल्या मॉडर्न ड्रेसिंग टेबलवर स्वतःला न्याहाळत ती विचारांत गुंगून गेली होती. मागचे काही दिवस त्याच वागणं बदलल्यासारखं वाटत होत. आधी तिच्याभोवती भिरभिरत असणारा तो तिच्यापासून दूर गेल्यासारखं वाटत होता. तिच्यासोबत प्रणयाच्या रंगात तासनतास रंगून जाणारा तो आता कुठे गायब होऊन जाऊ लागला. आताही जसा आला तसाच निघून गेला.. जणू कुठल्या रागात असावा...मी समोर असताना राग तरी कसा आठवतो त्याला... आणि आता शोधणार तरी कुठे त्याला... तिने आरशात स्वतःला पुन्हा पाहिलं. तिचे तांबूस सोनेरी केस विस्कटून कपाळभर पसरले होते. तिच्या मादक डोळ्यात त्याच्या विरहाची कळ ठसठसून दिसत होती. तिचे आरक्त गुलाबी गाल संतापाने अजुनच फुगले होते. तीच धारदार नाक किंचित थरथरत