Trushna ajunahi atrupt book and story is written by Vrushali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Trushna ajunahi atrupt is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तृष्णा अजूनही अतृप्त - Novels
by Vrushali
in
Marathi Horror Stories
सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून
सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. ...Read Moreबावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून
" अरे जावईबापू कसं काय येणं केलत... ते ही सकाळी.." घाईने सोफ्यावरील पसारा आवरत तिच्या बाबांनी त्यांच्या जावयासाठी बसायला जागा केली. तो... तिचा नवरा... अनय... सहा महिन्यांआधी तीच आणि अनयच लग्न झालं होत. नेहमी येताना अनय आणि ती एकत्रच ...Read Moreआज मात्र इतक्या सकाळी आणि घाईने आपल्या जावयाचं एकटच येणं त्यांना अपेक्षित नव्हतं. " बाबा.. बसा जरा बोलायचं होत.." त्याने बाबांचा हात पकडत त्यांना बळजबरी खाली बसवलं. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून बाबाही काळजीत पडले. " काय झालं.. सगळ ठीक तर आहे ना.." बाबांनी काळजीने विचारलं. मात्र त्यातही त्यांना आपल्या स्वरातील व्याकुळता लपवता आली नाही. " नाही... " अनय थोड्या शांतपणे उद्गारला." काय झालंय..
ती बाल्कनीतून एकटक बाहेर पाहत होती. खाली गार्डनमध्ये खेळणारी मुलं तिला नेहमीच सुखावत. सर्व झुडूपांवर उमललेली फुल आणि दुडूदुडू धावत खेळणारी मुल दोन्ही सारखीच. कधी कधी तीही त्यांच्यासोबत खेळायला जाई. त्याच्यात रमून जाताना आपला आयुष्यात काय चाललंय हे ती ...Read Moreजाऊन पुन्हा लहान मूल होऊन जाई... काश माझं पण बाळ असेल अस.... नुसत्या कल्पनेनेच ती लाजली. तिच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. आपल्याच धुंदीत शरमुन तिने आपले डोळे बंद केले. तिला आपल्या डोळ्यांवर गरम श्वास जाणवले. लगोलग तिच्या माथ्याचे चुंबनही घेतले गेले. तिला आतून भरून आल. त्या ओल्या स्पर्शाने ती शहारली..... कसं कळत ह्याला माझ्या मनातलं... त्याच्या स्पर्श तिच्या अंगभर फिरत
आताच प्रणयात न्हाऊन निघालेल अंग सावरत ती तिच्या मऊशार बेडवर विसावली. बाजुचीच मऊ गुलाबी फुलांची चादर तिने आपल्या देहाभोवती गुंडाळली... बराच वेळ झाला तो कुठेतरी निघून गेला होता.. आताशा तिला त्याला अजिबातच सोडवत नव्हतं. काय काय आणि कसं कसं ...Read Moreपेरत होता तो तिच्या आयुष्यात. तिच्या मऊ तांबूस सोनेरी कुरळ्या केसांना अजूनही त्याच्या स्पर्शाचा गंध येत होता. हलक्या नाजूक मोरपीसासारखी फिरणारी त्याची बोटं अजूनही तिच्या मानेवर रेंगाळत होती... नुसत्या त्याच्या स्पर्शाच्या आठवणीने ती रोमांचित झाली... त्याच्या खट्याळ आठवणीने ती स्वतःशीच हसली. हा माणूस असता तर.. हे असं लपून लपून भेटण्यापेक्षा किती मनमुराद जगलो असतो.. नाहीतर तो अनय... शी... बाबांना हाच
" ये... बस इथे.." गुरुजींच्या आवाजाने त्यांची तन्द्री भंग झाली. चुपचाप आवाज न करता तो गुरुजींनी बोट दाखवलेल्या मृगजीनावर जाऊन बसला. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. एक प्रकारची शांतता पूर्ण वातावरणात भिनली होती. गुरुजींच्या अनुयायापैकी कोणीतरी त्याला एका मातीच्या ...Read Moreकसलस लाल रंगाचं द्रव्य आणून दिलं. ते पाहताच त्याला भुकेची आठवण झाली. कधीपासून तो भयंकर खडतर प्रवास करत इथे येऊन पोचला होता. तहान भुकेपलीकडे इथे येऊन पोचायची ओढ इतकी जबरदस्त होती की घरातून निघाल्यापासून साधं पाणीही त्याने प्यायल नव्हतं. " ओम.. ते द्रावण पिऊन टाक.." गुरुजींनी अत्यंत प्रेमळ स्वरात आज्ञा केली. त्यानेही क्षणाचा विचार न करता तो वाडगा तोंडाला लावला. खारट, तुरट,